Bhor News : भोर : पुणे येथून भोर-वरंध घाटमार्गे रायगडला कार निघाली असताना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात होऊन कार सुमारे ४० फूट खोल दरीत पडली. मध्यरात्रीच्या सुमारास कुडली खुर्द गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, कार पडल्याचा आवाज आल्यानंतर मध्यरात्रीच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु आंधारामुळे मदतकार्य राबवता आले नाही.
कुडली खुर्द गावाजवळ झाला अपघात
पुणे शहराकडून निघालेला कारचालक भोर मार्गे महाडकडे जात होते. त्यांची चारचाकी रात्रीच्या वेळी रस्ता चुकली. त्यांनी हिर्डोशी मार्गे जाण्याऐवजी निगुडघर येथून नीरा देवघर रिंगरोड मार्गे धरणाला वळसा घेतला. रात्रीची वेळ आणि धुकेही असल्यामुळे कारचालकास रस्त्याचा अंदाज आला नाही. (Bhor News ) यामुळे त्यांची गाडी ४० फूट खोल दरीत जाऊन कोसळली.
रात्रीचा अंधार आणि धुक्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कार पडल्याचा आवाज आल्यानंतर मध्यरात्रीच ग्रामस्थांनी धाव घेतली. परंतु आंधारामुळे मदतकार्य करण्यास अडथळे येत होते. (Bhor News ) ग्रामस्थांनी प्रथम गाडीतील प्रवाशी सुखरुप असल्याची खात्री केली. त्यानंतर हा भाग दुर्गम असल्यामुळे क्रेन, जेसीबीची सोय नव्हती. शेवटी सर्व कुडली ग्रामस्थांनी एकीचे बळ दाखवले. गावात असणारे दोर, लोखंडी तारा आणि मनुष्यबळ वापरुन गाडी ढकलत रस्त्यावर आणली.
कोकणात जाण्यासाठी भोर हा मार्ग जवळचा आहे. या मार्गावर चोरी, लुटमारीच्या घटना घडत नाहीत. यामुळे रात्रीचा प्रवास करताना भीती वाटत नाही. शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन (एमएच १२ एफवाय ५८०९) जात होते. (Bhor News ) परंतु त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही. तसेच रस्त्यावर कुठेही दिशादर्शक फलक नव्हते. यामुळे चालक रस्ता चुकला अन् त्याची गाडी ४० फूट खोल दरीत पडली, अशी चर्चा अपघातस्थळी सुरू होती.
या मार्गावर दिशाफलक नाही. यामुळे आंबेघर आणि निगुडघर येथे नेहमी वाहन धारकाची दिशाभूल होते. यामुळे या पद्धतीचे अपघात होत आहेत. या मार्गावर त्वरित दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : सारोळा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग साळुंखे यांची बिनविरोध निवड