Bhor News : भोर : भोर तालक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांची संख्या वाढत आहे. येथील करंदी गावच्या शिवारात ग्रामस्थांना नुकतेच बिबट्याचे दर्शन झाल्याने गावात भितीचे वातावरण आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
गावात भितीचे वातावरण
बिबट्याने मानव वस्तीमध्ये प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. बिबट्या आल्याची माहिती ग्रामस्थांनी सोशल मिडियावर टाकली असून, गावकऱ्यांना सावध केले आहे. (Bhor News ) दरम्यान, सोमवारी (ता. ९) सायंकाळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत तातडीने नसरापूर वनविभागाला कळविण्यात आले. त्यानंतर संबंधित ठिकाणी कर्मचाऱ्यांनी भेट देवून माहिती घेत ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे सूचित केले.
याबाबत ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ते म्हणाले की, ग्रामस्थ आणि पाळीव प्राण्यांच्यावर बिबट्याने हल्ले करण्यापूर्वी वन विभागाने सापळा लावून त्याला पकडणे गरजेचे आहे. विद्यार्थी, नागरिक, शेतकरी महिला यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Bhor News ) वन अधिकारी, कर्मचारी, जरा लक्ष द्या, बिबट्याचा बंदोबस्त करा, अशी आर्त मागणी वनविभाग नसरापूर यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : युवा सेना भोर तालुका प्रमुखपदी स्वप्नील गाडे; तर विभाग प्रमुखपदी प्रवीण गाडे यांची निवड
Bhor News : पतसंस्थेमुळे खासगी सावकारीला आळा : चंद्रकांत बाठे यांचे मत
Bhor News : भोंगवलीत शेतीपंपाच्या केबलची चोरी; चोरट्यांच्या बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी