तुषार सणस
Bhor News : भोर : तालुक्यातील उंबरे व दिवळे या गावांमध्ये प्राथमिक शाळेतील मुलांनी आरोग्य रॅली काढून जनजागृती अभियान राबविले. या उपक्रमात प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, नर्स, उपकेंद्राच्या डॉक्टरांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
आजारांवर जागृतीपर घोषणा देत ग्रामस्थांना दिली माहिती
या उपक्रमासाठी कामथडी केंद्रप्रमुख विजय कारभळ तसेच दिवळे गावच्या सरपंच विद्या पांगारे, रामचंद्र ओंबळे व रचना संस्थेचे शिक्षण समन्वयक व जिल्हा आरोग्य समिती सदस्य श्रीपाद कोंडे यांनी पाठपुरावा केला. दिवळे येथील मुख्याध्यापिका संगीता हिंगणे, (Bhor News) केंद्रप्रमुख विजय कारभळ यांच्या पुढाकाराने शालेय मुलांनी डोळे येण्याची साथ, थंडी, ताप, मलेरिया, जीवनशैलीशी निगडीत आजार व क्षयरोग अशा आजारांवर जागृतीपर घोषणा देत गावातून फेरी काढली.
या वेळी संतुलित आहार, आहारात तृणधान्याचा वापर, हात स्वच्छ धुणे, सांडपाणी व्यवस्था याबाबत घोषणा फलक हातात घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. पोषक आहार आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व गावाचे सार्वजनिक आरोग्य याचा त्यांच्या अभ्यासावर सकारात्मक परिणाम होत असतो.(Bhor News) यासाठी असे उपक्रम भोलावडे, येवली, सारोळा, केळवडे, शिवरे, खोपी, कांजळे आदी गावांमध्ये पालकांच्या सहभागाने राबविणार असल्याचे रचना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : शाळा दूर असली, तरी आता चिंता नाही..; सावरदरे गावातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप
Bhor News : खेड शिवापूर टोल नाक्यावर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई; ६५ लाखांचा गुटखा जप्त
Bhor News : करंदी तंटामुक्त अध्यक्षपदी विठ्ठल खाटपे यांची निवड