जीवन सोनवणे
Bhor News : भोर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी कोंढणपूर फाटा (ता.हवेली) येथे सकल मराठा समाजाच्या व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने शनिवारी (ता.९) निषेध मोर्चा काढण्यात आला.
व्यापारी व व्यवसायिकांकडून स्वयंस्फूर्तीने बंद
यावेळी भागातील व्यापारी व व्यवसायीकांकडून स्वयंस्फूर्तीने बंदही पाळण्यात आला. शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी मुस्लिम आणि इतर जाती-धर्माचे नागरिकही सहभागी झाले. (Bhor News ) यावेळी मराठा आंदोलकांवर केलेल्या हल्याचा निषेध करून यापुढे अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नसल्याचे मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोंढणपूर फाटा येथून मोर्चास सुरुवात झाली. मराठा समाजाच्या महिलाही मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या.
कोंढणपूर फाटा येथून सुरुवात करून खेडशिवापूर भागातून मार्गावरून मोर्चा काढून पुन्हा कोंढणपूर येथे मोर्चाचा शेवट करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : राजापूर गावात शासकीय जागेवर घरे बांधून अतिक्रमण ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा..