तुषार सणस
Bhor News : भोर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे-सातारा महामार्गावरून सातारा येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कापूरहोळ येथे त्यांच्या सत्कार समारंभाचे नियोजन केले आहे. खेड शिवापूर टोल नाका ते सारोळा या मार्गावर चारचाकी रॅलीचे आयोजन देखील केले आहे. (Bhor News) यासाठी पुणे-सातारा महामार्गावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह?
यातच महामार्गाचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन कसे केले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : नसरापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
Bhor News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून शिवगंगा खोऱ्यात निषेध मोर्चा