जीवन सोनवणे
Bhor News : भोर: जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्याचा शुभारंभ रांजे (ता. भोर) येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यात पाऊसाचे प्रमाण कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वनराई बंधारा उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारा बांधण्याचे उद्दिष्ट असल्याने रांजे ( ता. भोर ) येथील ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गावातील ओढ्यांवर वनराई बंधारा बांधण्याचा शुभारंभ करण्यात आला. (Bhor News) यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटिल, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुमारे दोन लाख लिटर पाणी साठणार
यावेळी बोलताना सरपंच सुप्रिया जायकर म्हणाल्या कि, बंधाऱ्यात सुमारे दोन लाख लिटर पाणी साठणार असून त्याचा फायदा आजूबाजूच्या शेतकर्यांना तसेच जनावारांना होणार आहे. (Bhor News) रांजेमध्ये दोन वनराई बंधारे बांधणार असून भविष्यात पाऊस कमी झाल्यास अजून ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडवणार आहे. तर जिल्ह्यात सर्वप्रथम वनराई बंधारा बांधण्याचे काम भोर तालुक्यातील रांजे गावातून सुरुवात झाली असल्याची माहिती ग्रामसेवक भूषण पूरोहित यांनी दिली.
यावेळी विस्तार अधिकारी विजय कोळी,शिवराज पाटील, आमरजा दंडे, बांधकाम अभियंता इक्बाल शेख, कृषी अधिकारी युवराज कारंडे, मंडलाधिकारी प्रभावती कोरे, तलाठी रविन्द्र काळे, दीपाली चांदगुडे, सरपंच सुप्रिया जायकर, सदस्य शिवाजी तावरे, अश्विनी गुजर, मयूर कोंडे, अभिजीत कोंडे, ग्रामसेवक भूषण पुरोहित, सदस्य आबा कांबळे, मारुती गुजर, संदीप गुजर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी आनंद खुडे यांची नियुक्ती..
Bhor news : जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वेळू येथे मराठा बांधवांची सभा, दुचाकी रॅली