तुषार सणस
Bhor News : भोर : भोर तालुक्यातील करंदी गावामध्ये अनेक वर्षानंतर तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक लागली. अध्यक्षपदासाठी दोघे इच्छुक असल्याने आणि त्यांच्यामध्ये कोणीच माघार घेत नसल्याने शेवटी ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक लावली.
यामध्ये उपस्थित ग्रामस्थांमध्ये मतदान घेत अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. ग्रामसभेत एकूण १३५ ग्रामस्थ उपस्थित होते. त्यापैकी २९ ग्रामस्थांनी मतदानच केले नाही तर राहिलेल्या १०६ ग्रामस्थामध्ये मतदान होत ६४ मते मिळवत विठ्ठल विनायक खाटपे यांनी अध्यक्षपद मिळविले (Bhor News) तर प्रतिस्पर्धी निखिल रघुनाथ खाटपे ४२ मते मिळवत पराभव झाला.
पहिल्यांदाच पार पडली तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक
करंदीचे सरपंच नवनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव ग्रामसेवक शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणुक पार पडली. यावेळी उपसरपंच प्रयाग गोळे, सदस्य अनिल गायकवाड, सदस्या कोमल गायकवाड, किरण कोंढाळकर, माजी सरपंच दत्तात्रय बोरगे, माजी सदस्य तानाजी गोळे, (Bhor News) तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस सिध्देश्वर गायकवाड, प्राध्यापक महादेव गायकवाड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सरपंच व मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल खाटपे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर विठ्ठल खाटपे यांनी सांगितले की, गावामध्ये गटातटाचे कोणतेही राजकारण न करता गावातील सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन (Bhor News) गावामधील शांतता व एकमेकांमधील सौदार्याचे वातावरण कायम ठेवण्यासाठी तंटामुक्त समितीच्या माध्यामातुन प्रयत्न करणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा
Bhor News : नसरापूर येथून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
Bhor News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून शिवगंगा खोऱ्यात निषेध मोर्चा