तुषार सणस
Bhor News : भोर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटावी, यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा अभिनव उपक्रम राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरुपा संग्राम थोपटे यांनी राबविला आहे. भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील गावांमध्ये ही स्तुत्य मोहीम राबविली जात आहे.
असेच अनेक उपक्रम पुढे राबविणार
विद्यार्थ्यांना शिक्षणाचा, शाळेचा लळा लागावा, त्यांची प्रगती व्हावी, यासाठी तालुक्यातील प्रत्येक शाळेला भेट देत वह्या आणि खाऊ वाटप करणार असल्याची माहिती थोपटे यांनी दिली. हा उपक्रम आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे. (Bhor News ) निगुडघर, करंजगाव, गोळेवाडी, म्हसर खुर्द, धनगरवस्ती, आपटी नांदगाव, चऱ्हाटवाडी, वाठार, पिसावरे या गावातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत. असेच अनेक उपक्रम पुढे राबविणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी या वेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या ठिकाणी राजगड कारखान्याचे संचालक सुभाषराव कोंढाळकर, अध्यक्ष अतुल किंद्रे, राजेंद्र शेटे, प्रवीण शिंदे, सुरेश राजीवडे, विजय शिरवले, नरेश चव्हाण, संजय मळेकर, किसनराव कंक, लक्ष्मण पारठे, विष्णू मळेकर, बबन मालुसरे, गुलाबराव खुटवड, (Bhor News ) संतोष शिंदे, बाळासाहेब मालुसरे, संतोष केळकर, अंकुश चौधरी, संतोष साळेकर, एकनाथ म्हसूरकर, संतोष गोळे, शंकर पारठे, विष्णू खाटपे, दत्ता साळेकर यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : कदमवाकवस्ती येथे १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट