जीवन सोनवणे
Bhor News : भोर : काँगेस पक्षाची असलेली निष्ठा आणि घरातून मिळालेले संस्कार आणि समाजकार्य करण्याची असलेली जिद्द पाहून काँगेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उंबरे (ता.भोर) येथील आनंद दादा खुडे यांची विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.
आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
भोर येथील काँग्रेसच्या कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता.१५) करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्याहस्ते व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांच्या उपस्थितीत आनंद खुडे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
आनंदने यापूर्वी भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. आनंदने सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचे भोर तालुका युवकाध्यक्ष, दलित विकास आघाडीचे भोर वेल्हा तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन श्रमिक सेना संघटनेने भोर वेल्हा तालुकाध्यक्ष अशा सामाजिक संघटनांच्या मदतीने सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गोर गरीब,वंचित बहुजन समाजाला समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहे.(Bhor News) दरम्यान, विविध संघटनाच्या पदाच्या सहाय्याने सामाजिक कार्य करण्याची आवड आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून भोर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलली. सध्या भोरं तालुक्यातून पुणे विद्यापीठातील शिक्षणं घेणाऱ्या विद्यार्थी प्रश्नांवर करत असलेल्या कार्याची दखल घेऊन पक्षाने पुन्हा त्याच्यावर पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : महाराष्ट्र केसरीच्या दहीहंडीला “गौतमी पाटील” थिरकणार..