तुषार सणस
Bhor News : भोर : आंबाडे (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर शनिवारी दप्तराविना शाळा उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळेस विद्यार्थ्यांनी दहीहंडीचे औचित्य साधून दहीहंडी हा उपक्रम राबविला. त्याचबरोबर शैक्षणिक प्रश्न हंडीचे देखील आयोजन करण्यात आले.
दहीहंडीचे औचित्य साधून राबविला उपक्रम
विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी. या उद्देशातून सामान्य ज्ञानावर,पाठ्यक्रमावर आधारित तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्न तयार करून प्रश्नचिट्टया हंडीमध्ये टाकण्यात आल्या. (Bhor News ) त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ती हंडी फोडण्यात आली.
दरम्यान, हंडी फोडल्यावर त्यातुन प्रश्न चिट्टया खाली पडल्यावर सर्व मुलांनी प्रश्न चिट्टया गोळा केल्या व आपल्याला मिळालेल्या चिट्टीतील प्रश्नाचे उत्तर मुलांनी सांगितली. (Bhor News ) यातून हंडीचा आनंद मुलांना मिळाला तसेच आपल्याला कोणते प्रश्न मिळतात. याचे कुतुहल निर्माण झाले. आपल्यावर आलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलांनी पटापट सांगितली.
भोर तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून आंबाडे शाळेचा नावलौकिक आहे. (Bhor News ) शाळेस तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील आदर्श शाळेचा बहुमान मिळालेला आहे. हा उपक्रम विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे यांच्या प्रेरणेतून व केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक राजू कारभळ,शरद पवार, उज्वला भारती,मोहिनी गायकवाड यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhor News : राजापूर गावात शासकीय जागेवर घरे बांधून अतिक्रमण ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा..
Bhor News : नसरापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी निषेध मोर्चा; लाक्षणिक उपोषण