डोर्लेवाडी (पुणे) : येथील संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतींचे (ओपन मैदान) आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत नवखंडेनाथ प्रसन्न व मयूर सणस (पणदरे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
यात्रा कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतींना बैलगाडा शर्यत शौकीनांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून ३८५ गाड्या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. तब्बल ८ तास चाललेला शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडी शर्यत शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
या वेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रमेशराव मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोकराव नवले, समाजिक कार्यकर्ते बापूराव गवळी, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत जाधव, बापूराव निलाखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश कळकुटे यांच्या हस्ते या आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील गाड्यांनी या शर्यतीत सहभाग घेतला होता.
दरम्यान, विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पंच म्हणून दत्ता नवले, अजित महूडे, विशाल जाधव, रत्नसिंह कालगावकर, दादा नवले, सतिश ढमाळ, बापू जाधव, राहुल जाधव, अभिजित गाडे, डॉ. आकाश नवले, सागर नवले, अमोल भोसले, कल्याण कालगावकर यांनी काम पाहिले.
विजेत्यांची नावे व कंसात गाव
प्रथम क्रमांक – मयूर सणस, (पणदरे)
द्वितीय क्रमांक – रामभाऊ भोळे, खोरोची (इंदापूर),
तृतीय क्रमांक – पै. विश्वजित आबा मदने (निरावागज)
चतुर्थ क्रमांक – काका ड्राइव्हर (वानेवाडी) / आप्पा पैलवान (वाई)
पाचवा क्रमांक – अस्मिता वसेकर (उंबरमळे),
सहावा क्रमांक – रिद्धी सिद्धी तरुण मंडळ (पिंपळी)
सातवा क्रमांक – विठोबा बिरोबा प्रसन्न (भवानीनगर)