राजेंद्रकुमार शेळके
Bhimratna Award | मंचर : (ता.आंबेगाव) येथील प्रसिद्ध साहित्यिक व बहुभाषिक कवी मोहम्मद शकील जाफरी यांना पंचशिल उत्कृष्ट मंडळ (रजि.) घोडेगांव या संस्थेतर्फे देण्यात येणारा भिमरत्न पुरस्कार – २०२३ आणि कसबे बंधू विकास मंडळ (रजि.) आणि माता रमाई महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) गोहे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या भिमरत्न पुरस्कार – २०२३ देऊन घोडेगाव आणि गोहे खुर्द इथे झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
मो.शकील जाफरी हे सामाजिक कार्यकर्ता, जादूगार, बहुभाषिक कवी, मुक्त पत्रकार, व्याख्याता, लेखक आणि नाणे – नोटा व टपाल तिकिटांचे संग्राहक म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत.मो. शकील जाफरी हे १९८८ पासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण धर्म निरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयांवर जनजागृती कार्य करीत आहेत.
मो. शकील जाफरी यांची “हे प्रेषिता” हे मराठी कविता संग्रह आणि “इस्लाम : समज – गैर समज” हे मराठी वैचारिक लेख संग्रह तसेच तेलुगू भाषेत तीन कविता संग्रह, एक गजल रुबाई संग्रह, एक कथासग्रह आणि एक पद्य संग्रह असे एकूण आठ पुस्तक प्रकाशित आहेत.
बौद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जननायक बिरसा मुंडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. मराठी, उर्दू, हिंदी आणि तेलुगू भाषेतून साहित्य सेवा करणारे मो. शकील जाफरी हे गेल्या ३५ वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, एड्स जनजागृती, पर्यावरण धर्म निरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता या सारख्या अनेक विषयांवर जनजागृती कार्य करीत आहेत.
बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जननायक बिरसा मुंडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात मंचरचे सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक मोहम्मदशकील जाफरी यांना भिमरत्न पुरस्कार – 2023 या पुरस्काराने गौरविण्यात आले.