Bhimashankar Forest : घोडेगाव (पुणे) : जंगलामध्ये रानभाज्या काढण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा कठड्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घोडेगाव परिसरात घातली आहे.
अजय शशिकांत कराळे (रा. कानसे, ता. आंबेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
घोडेगाव परिसरातील घटना…
मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर येथील जंगलात अजय कराळे, अक्षय कराळे व संतोष चपटे असे तिथे मिळून डोंगरामध्ये चाव्याचे कोब व कोळची भाजी | काढण्यासाठी गेले होते. मात्र पाऊस पडत असल्याने डोंगरवाटा व कडे निसरडे झाले होते. डोंगर चढत असताना एका अवघड वळणावर अजय कराळे याचा पाय घसरून तो २५ ते ३० फूट खाली पडला. 1
अजयच्या डोक्याला मार लागला व हात फॅक्चर झाला. त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ डोंगरावरून खाली आणून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले. (Bhimashankar Forest ) मात्र तोपर्यंत त्याने आपले प्राण सोडले होते. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अजय कराळेचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
दरम्यान, पावसाळ्यामध्ये जंगलात अवघड ठिकाणी रानभाज्या काढण्यासाठी जाऊ नये, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. (Bhimashankar Forest ) अजयचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्रांवर आघात झाला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Trekker Death : भीमाशंकरला ट्रेकिंग करताना गिर्यारोहकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन..