सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण: पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयाच्या वैष्णवी सपकळ आणि वैष्णवी गायकवाड या विद्यार्थ्यांनीची एन .एम .एम. एस परीक्षेअंतर्गत सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य बी एस काळे यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थिनींचे इंदापूर तालुक्यात भरभरून कौतुक
भारत सरकारच्या वतीने इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. यातील गुणवंत मराठा समाजातील मुलामुलींसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती दिली जाते. (Bhigwan News) विद्यालयाच्या वैष्णवी सपकळ आणि वैष्णवी गायकवाड पात्र विद्यार्थीनींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणासाठी वार्षिक दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या यशासाठी विद्यार्थिनी वैष्णवी सपकळ व वैष्णवी गायकवाड यांना विद्यालयाचे शिक्षक बळवंत निंबाळकर, संतोष पवार, नितीन कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले. (Bhigwan News) यशस्वी विद्यार्थिनींचे पळसदेवसह इंदापूर तालुक्यात भरभरून कौतुक होत आहे.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे सर्व संचालक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगिराज काळे, सर्व संचालक मंडळ , विद्यालयाचे प्राचार्य बी एस काळे, पर्यवेक्षक विकास पाठक यांनी अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त तक्रारवाडीत 41 बाटल्यांचे रक्तसंकलन