भिगवण : तक्रारवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नवीन इमारत बांधण्यासाठी दीड कोटी रुपयांपर्यंतचा निधी केला जाईल, असे आश्वासन भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तक्रारवाडी ग्रामस्थांना दिले.
ग्रामपंचायत ठराव मिळाल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन
संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक शाळा कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तक्रारवाडी हे आहे. तक्रारवाडी प्राथमिक शाळेत जवळपास 500 च्या वर विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. (Bhigwan News) या शाळेत तक्रारवाडी सह भिगवन मदनवाडी खानोटा डिकसळ व आसपासच्या परिसरातील गरजूवंत कष्टकरी मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुले मुली कौशल्यपूर्ण शिक्षण घेताना पाहायला मिळत आहे.
परंतु, तक्रारवाडीची ही शाळा फार जुनी झाली असून, मोडकळीस आलेली आहे. या विषयाचा प्रस्ताव तक्रारवाडी गावच्या नवनिर्वाचित सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिला होता. याची दखल घेत हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले की, ग्रामपंचायत ठराव मिळाल्यानंतर एक विशेष बाब म्हणून या प्राथमिक शाळेसाठी दीड कोटीपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रयत्न करू. चांगल्या दर्जाची शाळा बांधून आणखी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जावा.
या कार्यक्रमप्रसंगी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ, उपसरपंच आशा साहेबराव जगताप, ग्रामपंचायत सदस्य शरद वाघ, प्राजक्ता वाघ, संगीता वाघ तसेच भिगवण गावच्या सरपंच दीपिका शिरसागर, (Bhigwan News) कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव, विश्वास देवकाते, माजी उपसभापती संजय देहाडे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुतराव वनवे, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, अरविंद जगताप, संजय जगताप, संजय रायसोनी, शामराव परकाळे, मोहन वाघ, रवींद्र वांझखडे, माजी सरपंच गणेश वायदंडे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : भिगवणमध्ये आयशर-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर नऊ जण जखमी
Bhigwan News : पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई; नागरिक नाराज!