Bhigwan News : भिगवण : भिगवण स्टेशन येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखांचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे एकूण २१ गावांतील शाखांपैकी पहिली महिला शाखा ही भिगवण स्टेशन येथे उभारण्यात आली. महिलांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शाखेच्या उद्घाटनासाठी मराठा समाजाबरोबरच इतर समाजबांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत गावातून भव्य रॅली काढण्यात आली.(Bhigwan News) शाखा अध्यक्षपदी मिलिंद जगताप, उपाध्यक्षपदी अक्षय काळे, हर्षल चंद, कार्याध्यक्षपदी राहुल वागजर, मंगेश दिवेकर, सचिव गणेश पवार, संतोष गुणवरे, खजिनदार मनोज सस्ते, मंगेश अनभुले, कोषाध्यक्ष संतोष महाराज गाडेकर, सतीश मत्रे तर मार्गदर्शक म्हणून सकल मराठा समाजातील प्रमुखांची निवड करण्यात आली.
महिला शाखा अध्यक्षपदी निता म्हस्के, उपाध्यक्ष म्हणून नूतन नागवे, मनीषा मत्रे, कार्याध्यक्ष सोनाली शिंदे, दीपाली चव्हाण, कोषाध्यक्ष शोभा काळे, वैशाली ढोणगे, सचिव स्वाती कदम, सरिता गाडेकर, खजिनदार सोनाली दिवेकर, निर्मला जंजिरे तर मार्गदर्शक म्हणून सकल मराठा समाजातील प्रमुख महिलांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. (Bhigwan News) आगामी काळात समाजातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. मराठा समाजातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे महिला अध्यक्ष निता म्हस्के यांनी सांगितले.
याप्रसंगी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष अतिश गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अॅड. प्रिया काटे पाटील, तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर, पद्मा खरड तसेच कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, (Bhigwan News) भिगवणच्या सरपंच दीकिका क्षीरसागर, उपसरपंच मुमताज शेख, तृप्ती जाधव, सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच अभिमन्यू खटके, ग्रामपंचायत सदस्य दत्ता धवडे, अमित वाघ, गुराप्पा पवार, बाळा भोसले, जुलेखा शेख तसेच बाळासाहेब बनसोडे, कुमार काळे, मनोज चव्हाण, सुरेश बिबे, जुबेर शेख, जब्बार शेख, हनुमंत अनभुले तसेच भिगवण स्टेशन परिसरातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : तक्रारवाडीत भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा
Bhigwan News : जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत बनसुडे विद्यालयाचे घवघवीत यश