Bhigwan News : भिगवण : पुणे जिल्हा परिषदेत गेले अनेक वर्षांपासून रखडलेली मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख पदोन्नती तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्ठमंडळास दिले.
प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांची भेट घेत त्यांचे स्वागत करण्यात आले. (Bhigwan News) या वेळी जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनिल वाघ, राज्य शाखेचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य सल्लागार महादेव माळवदकर, जिल्हा सरचिटणीस संदीप आप्पा जगताप, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा प्रियतमा दसगुडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी, कोषाध्यक्ष सुनील लोणकर, शिरूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक अवि चव्हाण, हवेली तालुका अध्यक्ष सचिन हंगरगे, जुन्नर तालुका अध्यक्ष राजेश दुरगुडे, मुळशी तालुका अध्यक्ष संदीप दुर्गे, सतीश बुळे, उमेश उतळे हे उपस्थित होते.
या वेळी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (Bhigwan News) जिल्ह्यातील ४९२ शिक्षकांच्या वेतन त्रुटी संदर्भात राज्य शासनास तातडीने अहवाल पाठविण्याचा आग्रह शिष्टमंडळाच्या वतीने धरण्यात आल्याचे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी दीड कोटीचा निधी देणार; हर्षवर्धन पाटील यांचे आश्वासन
Bhigwan News : भिगवणमध्ये आयशर-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकजण जागीच ठार तर नऊ जण जखमी