सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : ग्रामीण भागात गावचा विकास हा आज देखील ग्रामपंचायतमार्फत चाललेला असतो. गावातल्या लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासला कसलाही तडा न जाता जनतेने दिलेले हे पद फक्त मिरवायला नसून त्या पदाचा वापर जनतेच्या हितासाठी केला पाहिजे.
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावातील सत्ताबदल झाल्यानंतर गावातील अंतर्गत रस्त्याचे नुसते भूमिपूजन नाही तर प्रत्यक्षात लाखो रुपयांच्या कामांना प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. (Bhigwan News) सरपंच मनीषा वाघ, उपसरपंच आशा जगताप आणि सदस्या संगीता वाघ, प्राजक्ता वाघ, शरद वाघ या सर्व विकासकामाच्या दर्जावर लक्ष देत असून, कामे वर्षानुवर्ष टिकावू व्हावीत यासाठी प्रयत्न केला जात आहे.
नुसताच प्रयत्न केला जात नाही तर आपल्या वार्डातील रस्ता हा मजबूत राहावा म्हणून ग्रामपंचायत सदस्य शरद संपत वाघ हे सिमेंट रस्ता बनविताना तो दर्जेदार व्हावा, याकडे तर लक्ष दिलेच. (Bhigwan News) पण रस्त्याची गुणवत्ता ही कायमस्वरूपी चांगली राहावी म्हणून रस्ता बनवून झाल्यापासून स्वतः सकाळपासून ते संध्याकाळपर्यत वेळोवेळी हातात पाण्याचा पाईप घेऊन सिमेंट रत्स्याला जातीने पाणी मारत आहे.
भविष्यात रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करणार
रस्त्याला जास्तीत जास्त पाणी मारले तर तो जास्त दिवस टिकेन या हेतूने ते आपले कर्तव्य बजावत आहेत. यावरच ते न थांबता भविष्यात रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करणार असून सुशोभीकरणाकडेही लक्ष देणार आहेत, असे ग्रामपंचायत सदस्य शरद वाघ यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना सांगितले.
कर्मयोगी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत वाघ ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,विजयराव जगताप, सचिन वाघ यांनी गावातील विकासकामासाठी अधिकचा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : पळसनाथच्या अहिल्या शिंदेची कुस्ती स्पर्धेत ‘सुवर्ण’ कामगिरी