सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस बिले अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस बिले काही तांत्रिक अडचणीमुळे गेली तीन-चार महिने शेतकऱ्यांची रखडली होती. मात्र केंद्र सरकारने एनसीडीसी मार्फत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला १५० कोटी रुपयाचे दिलेले कर्ज कारखान्याच्या खात्यात जमा होताच, ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारने एनसीडीसी मार्फत कर्ज दिले आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या कर्जाबाबत सतत पाठपुरावा केला आहे. (Bhigwan News) सदरचे कर्ज कारखान्याच्या खात्यात जमा होताच कारखान्याच्या प्रशासकीय विभागाकडून सदरचे विलंब झालेली शेतकऱ्यांची ऊस बिले तातडीने जमा केली गेली आहे.
कर्मयोगी सहकारी साखर कारखाना गेली तीन-चार वर्ष अडचणीचा सामना करत आहे. मात्र गेल्या प्रत्येक सीजन मधील शेतकऱ्यांची ऊस बिले कारखान्याने पुर्ण दिली आहेत. (Bhigwan News) कारखान्याच्या इतिहासात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही शेतकऱ्याचे ऊस बिल बुडवले नाही. मात्र विरोधी लोकांकडून सतत कारखान्याची बदनामी केली जात होती.
दरम्यान, कारखाना दिवाळखोरीत निघाला अशा अफवा पसरवल्या जात होत्या. कारखान्याचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट केले जात होते. (Bhigwan News) परंतु, कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले जमा करताच कारखान्यास सतत विरोध करणाऱ्यांची भंबेरी उडाली असून तोंडघशी पडल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यात असल्याचे भाजप कार्यकर्त्यांची म्हणणे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचताच दत्तकला शिक्षण संस्थेत एकच जल्लोष