Bhigwan News : भिगवण : राज्याचे माजी संसदीय कामकाज व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी दिली.
पळसनाथ विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
वाढदिवसाचे औचित्य साधून पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विद्यालयातील प्राथमिक, माध्यमिक विभाग व पळसनाथ मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातील गरजु सुमारे ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. (Bhigwan News) तर कर्मयोगीचे संचालक व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे यांनी स्वखर्चातून पळसनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
या वेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे म्हणाले की, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विद्यालयासाठी विविध भौतिक, शैक्षणिक सुविधा, इमारत निधी, विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून भरीव मदत केलेली आहे. त्यांच्या योगदानातूनच पळसदेवसारख्या ग्रामीण भागातही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम शिक्षण संस्था करीत आहे. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यालयात वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, खाऊ वाटप, रक्तदान शिबिर आदी विधायक उपक्रम राबवले जातात.
याप्रसंगी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे, सचिव योगीराज काळे, खजिनदार बबन काळे, (Bhigwan News) सरपंच आजिनाथ पवार, सदस्य विकास शिंदे, महेंद्र काळे, मधुकर रंधवे, सतिश काळे, अक्षय काळे, विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे, पर्यवेक्षक विकास पाठक, अमोल रणासिंग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : पळसनाथ विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा सत्कार