Bhigwan News : भिगवण : सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत विद्यार्थी हितासाठी ब्राईट लाइफ संस्थेकडून राबवले जाणारे उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहेत, असे मत पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे यांनी व्यक्त केले.
पळसनाथ विद्यालयात सायकल वाटप कार्यक्रम
पळसदेव येथील पळसनाथ विद्यालयात आयोजित मोफत सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. स्वर्गीय एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर) आणि ब्राईट लाईफ सामाजिक संस्था, पळसदेव यांच्या संयुक्त विद्यमाने हुशार होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
या वेळी पळसनाथ विद्यालयातील अनुष्का भोंग आणि प्रियंका आरडे या विद्यार्थिनींना मोफत सायकली देण्यात आल्या. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भूषण काळे, ब्राईट लाईफ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ माने, सचिव सिद्धनाथ माने, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल काळे, पत्रकार रामदास पवार, पोस्ट ऑफिसर रासकर, विद्यालयाचे प्राचार्य बाळू काळे, (Bhigwan News) पर्यवेक्षक विकास पाठक, तानाजी इरकल, अशोक जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले.
पळसनाथ विद्यालयात सायकल वाटप कार्यक्रम
Bhigwan News : ..अखेर विहीर मालक व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ; विहीर मालकाला अटक