सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : ग्रीन वर्ल्ड यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त खऱ्या देशभक्तांचा सन्मान म्हणून दिला जाणारा यावर्षीचा ‘ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया २०२३’ हा मानाचा पुरस्कार भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराने भिगवण पोलीस ठाण्याची व भिगवणकरांची मान उंचावण्यास मदत झाली आहे.
आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव
भिगवण व परिसरात केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतल्यानंतर त्यांनी अतिशय उत्तमपणे रस्ते महामार्ग, गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, अपघात यासोबतच अनेक समस्यांवर वेळीच उपाययोजना करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भिगवणमध्ये प्रत्येक नागरिक मोकळा श्वास घेत आहे. समस्या कोणतीही असो, दिलीप पवार या समस्येचे निराकरण करतात. (Bhigwan News) भिगवण व परिसरातील नागरिकांचा पोलीस ठाण्यावरील विश्वास पवार यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे वाढीस लागला आहे. अशा पोलीस अधिकाऱ्याचा हा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
या पुरस्काराचे वितरण सोमवारी (ता. १४) पुणे विद्यार्थी गृहाचे मुक्तांगण इंग्लिश स्कूल व कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विद्यानगरी, पर्वती, पुणे या ठिकाणी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या पुरस्कार वितरण प्रसंगी विविध शाळा व महाविद्यालयांना ग्रीन वर्ल्ड क्लबच्या वतीने दहा हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे
पुरस्काराच्या वितरण प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय कणेकर, राम बंधू मसालेचे अध्यक्ष हेमंत राठी, रावेतकर ग्रुपचे अध्यक्ष अमोल रावेतकर, विक्रम इन्फ्राटेक डेव्हलपरचे सीएमडी विक्रम गायकवाड, ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवा हे उपस्थित राहणार आहेत. (Bhigwan News) ‘ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया’ हा पुरस्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना जाहीर झाल्यानंतर विविध संघटनांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : ..अखेर विहीर मालक व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ; विहीर मालकाला अटक