सागर जगदाळे
Bhigwan News : भिगवण : उन्हाळ्याच्या सरते शेवटी भिगवणला पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले असून टॅकर मधून पाणी मिळविताना नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांची पाणी मिळविण्यासाठी वाढलेली झुंबड यामुळे अनुचीत प्रकार घडण्याची शक्यता आहे. याबाबत संबधीत ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
भिगवण हे गाव तसे उजनी धरणाच्या आखत्यारित असणारे गाव आहे. या वर्षी अधिकचा उन्हाळा असल्याने उन्हाळ्याच्या सरतेशेवटी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या पाणी टंचाई मुळे भिगवण येथील ग्रामपंचायतीने पाण्याचा टॅंकर सुरू करून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सुवीधा उपलब्ध करून दिली आहे.(Bhigwan News) ग्रामपंचायत प्रशासनाकडून सकाळी टॅकरची उपल्बधता करून देण्यात आलेली आहे.
त्यामुळे सकाळ पासूनच भिगवणकरांची टॅंकर मधून पाणी मिळवण्यासाठी धडपड सुरू असते. काही दिवसापुर्वी ऑनलाइन टेंडर व ऑफलाइन टेंडर या विषयावरती विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. (Bhigwan News) ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने तसेच हा विषय मार्गी लावताना ग्रामसभेचा कोरम अपुरा राहिल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले. या विषयावरती विद्यमान सरपंच व त्यांच्या सदस्यांमध्ये विरोधाभास झालेला होता.
सत्ताधारी सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष
सध्या भिषण पाणीेटंचाईमध्ये सत्ताधारी सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने गावच्या पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले. त्यातून सकाळी अंघोळीकरिता पाणी विकत घ्यावे लागते. (Bhigwan News) ही मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबधीत ग्रामपंचायत प्रशासन हे विद्यमान सदस्यांच्या बोटावरचे खेळणे होऊन बसले असून त्यातून भिषण पाणी टंचाईला भिगवणकर सामोरे जात आहेत. या संकटातून बचाव करण्यासाठी सर्वांनी विचारपुर्वक एकत्रीत येऊन सगळ्यांना सकाळी पाणी कसे मिळेल या बाबत प्रशासनाला मदत केली पाहिजे. यासाठी संबधीत ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी एकदिलाने पुढाकार घ्यावा. असे सर्वसामान्य चर्चा करू लागला आहे.
सरपंच दिपीका क्षीरसागर म्हणाल्या की, गेल्या आठ ते दहा दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. महावितरणच्या माध्यमातून मिळणारी विज वारवांर खंडीत होत असल्याने पाणी साठवण टाक्या पुर्ण क्षमतेने पाण्याने भरल्या जात नाही. त्यातून कमी दाबामुळे विद्युत पंप जळणे, पाईप फुटणे असे प्रकार होत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सदस्य व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत. (Bhigwan News) लवकरच पाणि पुरवठा सुरळीत केला जाईल.
भिगवन गावचे नागरिक भाऊ खरात यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ओढवलेल्या जल संकटामुळे पाण्याचा टँकर हा वार्डात आल्यानंतर त्या ठिकाणी पाणी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यातूनच धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहे. भिगवन ग्रामपंचायत ने हा पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा असं सामान्य नागरिकांचे म्हणणं आहे
दरम्यान, ऑनलाइन टेंडर व ऑफलाइन टेंडर या विषयावरती विशेष ग्रामसभा आयोजन करण्यात आलेली होते परंतु हा विषय मार्गी न लागताच कोरम अभावी ग्रामसभा तहकूब करावी लागली होती व या विषयावरती विद्यमान सरपंच व त्यांच्या सदस्यांमध्ये विरोधाभास झालेला होता.
भिगवण ग्रामपंचायतीची असणारी डिकसळ पुलावरची पाईपलाईन सुरू केलेली आहे. त्यामुळे जो पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो येत्या एक ते दोन दिवसांमध्ये मिटणार आहे.त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे.
– ग्रामसेवक दत्तात्रय परदेशी भिगवण
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : भिगवण परिसरात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह
Bhigwan News : भिगवण येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के