सागर जगदाळे
भिगवण : Bhigvan News – यंदाचा उन्हाळाची दाहकता वाढत असून यंदाचा उन्हाळा तीव्र पडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.. यातच भिगवन (Bhigvan News)जवळील अकोले गावाच्या शेजारी वनक्षेत्रातील वन्य प्राण्यांसाठी तयार केलेले पानवठे मोकळे ठणठणीत दिसत आहेत…याचीच नोंद घेऊन रोटरी क्लब भिगवन तर्फे गेल्या दोन महिन्यापासून दर 10 – 12 दिवसानंतर त्या पाणवठयामध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे व त्या परिसरातील हरीण, चिंकारा, ससे,कोल्हे इत्यादी मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची सोय सातत्याने केली जात आहे… (Bhigvan News)
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे,सचिन बोगावत, रियाज शेख,संपत बंडगर,बिल्ट ग्राफिक्सचे बाळासाहेब सोनवणे , धरणेंद्र गांधी, काळे , संजय खाडे, रणजीत भोंगळे, औदुंबर हुलगे , प्रदिप ताटे इत्यादी उपस्थित होते…
यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे म्हणाले की यंदाचा उन्हाळा वाढत असल्यामुळे येथील वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी मानवी वस्तीत येऊन किंवा जवळीलच रोडला येऊन अपघात होऊन त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे…
अशातच वन खात्याद्वारे तयार केलेले कृत्रिम पानवठे मोकळे ठणठणीत असून त्यांना पाण्याची सोय म्हणून रोटरी क्लब भिगवन तर्फे आम्ही गेल्या दोन महिन्यापासून दर 10 -12 दिवसाला टँकरद्वारे त्यात पाण्याची सोय करून त्यांची तहान भागवत आहे… यावेळी बोलताना संपत बंडगर म्हणाले की सर्वांना या माध्यमातून आवाहन करण्यात येते की, जर कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी रोटरी क्लब ऑफ भिगवन किंवा तेथील वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जेणेकरून तेथील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात तहान भागवली जाईल…
यावेळी बोलताना सचिन बोगावत म्हणाले की आम्ही यापुढेही पावसाळा सुरू होईपर्यंत पाणवठयामधील पाणी संपले की त्यात टँकरद्वारे पाणी टाकणार आहोत व मुक्या प्राण्यांची पाण्याची व्यवस्था करणार आहोत…. यावेळी टँकरचे नियोजन किरण रायसोनी, कमलेश गांधी, निखील बोगावत अफजल शेख, ॲड.रुपेश झाडे व वैशाली बोगावत यांनी केले….
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhigwan News : हरवलेले तब्बल ६ लाखांचे ३२ मोबाईल भिगवण पोलिसांनी केले परत..!
Bhigwan News | भिगवण मेडिकल असोसिएशन स्पार्टन चॅम्पियन क्रिकेट चषकाचे मानकरी