Bhigvan News : भिगवण : राज्यातील सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेतल्यास, तुलनेने पर्जन्यमान कमी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. बेसूमार वृक्षतोड हे यामागील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. ‛वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हणून उपयोग नाही, तर त्यासाठी प्रत्यक्षात कृती करावी लागणार आहे. हाच संदेश घेऊन, भिगवण येथील परिवर्तन युवा फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, भिगवण येथील स्मशानभूमी व दफनभूमीमध्ये वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
परिवर्तन युवा फाउंडेशनच्यावतीने वृक्ष लागवड करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, वृक्ष व मोकाट प्राण्यांपासून या वृक्षांचे संवर्धन व जतन व्हावे यासाठी येथील ज्योती हॉटेलचे मालक पवार बंधू तसेच स्वर्गीय कोमल हनुमंत चव्हाण व स्वर्गीय डॉ. सूर्यकांत काटे यांच्या स्मरणार्थ ट्री गार्ड सौजन्य देण्यात आले. झाडांना पाणी घालण्यासाठी भिगवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर यांच्याकडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. झाडांच्या पुढील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी देखील त्यांनी घेतली.
या प्रसंगी उपस्थित रोटरी क्लब, सायकल क्लब व विविध सामाजिक संघटनांनी हातात खोरे घेऊन झाड लावण्यासाठी श्रमदान केले. झाडे लावून झाल्यानंतर प्रत्येक झाडाभोवती गार्ड लावून वृक्षारोपण उपक्रम पार पाडला. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमासाठी श्रमदान करत उपस्थित राहिल्याने परिवर्तन युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. Bhigvan News
वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रंजीत भोंगळे, माजी उपाध्यक्ष संजय खाडे, संपतराव बंडगर, रियाज शेख, डॉ. अमोल खानवरे, सायकल क्लबचे अध्यक्ष केशव भापकर, सामाजिक कार्यकर्ते रमेशबाबा धवडे, माजी उपसरपंच जयदीप जाधव, अण्णासाहेब धवडे, पुणे जिल्हा जैन संघटनेचे अध्यक्ष सचिन बोगावत, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर , अजिंक्य माडगे, प्रदीप वकसे, प्रवीण वाघ, संतोष सवाने, अल्ताफभाई शेख, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक संजय रायसोनी, अर्जुनराव तोडकर, गणेश राक्षे, ओंकार मुळे, किरण रायसोनी, विशाल पाचांगणे, आकाश उंडाळे, योगेश चव्हाण, माऊली चव्हाण, मेजर के. डी. भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते. Bhigvan News