पुणे: पुण्यातील जुन्नरमधील शिवनेरी किल्ला येथे पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 50 ते 60 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अधिक माहिती अशी की, पर्यटकांवर शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिरा जवळ आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 ते 12 पर्यटकांना आग्या माशा चावल्या आहेत. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे किल्यावर पर्यटकांची गर्दी आहे. माशांचा हल्ला झाल्यामुळे पर्यटक किल्ल्यावरून खाली येत आहेत. तर वनविभागाने किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली आहे.
दगड मारल्यामुळे मधमाश्यांनी केला हल्ला
दरम्यान, आग्या मधमाशांच्या हल्ल्यात 55 ते 60 पर्यटक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पर्यटकांना तातडीने गडावरून खाली येण्यास सांगितलं आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाल्या आहेत. वनविभाग माश्यांना शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहे. दगड मारल्यामुळे मधमाश्यांनी हल्ला चढवल्याचं काही पर्यटकांनी सांगितलं. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झाले. त्यानंतर त्यांना अॅम्ब्युलन्सममधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.