Khadakwasla Dam : खडकवासला, (पुणे) : पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ तरुणी बुडाल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला तर सात मुलींना वाचवण्यात यश आले. या गंभीर घटनेनंतर जलसंपदा विभागाला जाग आली असून खडकवासला धरणातील पाण्यात पाय ठेवल्यास कडक कारवाईचा इशारा दिली आहे. (Khadakwasla Dam)
खडकवासला धरणात पर्यटकांना पोहण्यासाठी बंदी
खडकवासला धरणात पर्यटकांना पोहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील जलसंपदा विभागाने पर्यटकांनासह स्थानिकांना खडकवासला धरणात उतरण्यास बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्यांव ५०० रुपये दंडासह कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच खडकवासला धरण परिसरात नियमावलींचा फलक लावून दहा पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. वीकेंडला म्हणजेच शनिवारी आणि रविवारी खडकवासला धरण तसेच सिंहगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
शाळकरी मुलांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींना उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळं खडकवासला धरणाच्या चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेकदा अतिउत्साही पर्यटक धरणात उतरून पोहण्याचा प्रयत्न करत असतात. सोमवारी नऊ तरुणी धरणात बुडाल्याची घटना समोर आल्यानंतर आता जलसंपदा विभागाने पर्यटकांना खडकवासला धरणात उतरण्यास बंदी घातली आहे.
याशिवाय पोहण्यासाठी धरणात उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड आणि पोलीस कारवाई केली जाणार असल्याचे फलक चौपाटीवर लावण्यात आले आहे. त्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात खडकवासला धरणात मोठी घटना घडल्यामुळं पर्यटकांची निराशा झाली आहे. जलसंपदा विभाग आणि स्थानिक पोलीस खडकवासला धरणाच्या चौपाटीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, बुलढाण्याहून फिरण्यासाठी आलेल्या नऊ तरुणी सोमवारी पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी उतरल्या होत्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळं सर्व तरुणी धरणात बुडाल्या होत्या. स्थानिक रहिवासी संजय माताळे यांच्या प्रसंगावधानतेमुळं सात तरुणींना वाचवण्यात यश आलं होतं. परंतु दोन तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता स्थानिक प्रशासनाकडून अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Khadakwasla Dam | मोठी बातमी : पुण्यातील खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या
Khadakwasla Dam | खडकवासला धरणात पोहायला गेल्या अन् जीव गमावून बसल्या,दोघींचे मृतदेह अखेर सापडले