बारामती Baramati News : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असल्याने आगीच्या घटना घडत आहेत. अतिउष्णतेमुळे बारामती (Baramati News) एमआयडीसीत दुचाकीने पेट घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.२३) दुपारी २ च्या सुमारास घडली. (Baramati News) यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. (Baramati News)
बारामतीतील एमआयडीसी चौकातील शॉपिंग कॉम्लेक्ससमार दुचाकीने घेतला अचानक पेट
एमआयडीसी चौकातील शॉपिंग कॉम्लेक्ससमारे ही दुचाकी लावण्यात आली होती. दुचाकीने अचानक पेट घेतला. सुदैवाने येथील स्थानिकांनी अग्नीरोधक यंत्रणेचा वापर करुन ेआग विझवण्यात यश आले. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निश्वा:स सोडला.
उन्हात लावलेल्या गाडीने अतिउष्णतेने पेट घेतला. रस्त्यावर दुचाकीने चालू असताना पेट घेतला असता तर,या चर्चेने बारामतीकर धास्तावले. सोमवारी वालचंदनगर भागात एका चारचाकी वाहनाने पेट घेतला आहे. त्यापाठोपाठ बारामतीत ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे अतिउष्णता जीवावर बेतण्याची भीती निर्माण झाली आहे. वाहनांना ‘पार्किंग’ करण्यासाठी सावली शोधणार कुठे?असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे
दरम्यान, बारामतीकर अतिउन्हाने होरपळुन गेले आहेत. सध्या ४० अंश सेल्सिअस तपमान असताना थेट दुचाकी, चारचाकी वाहने पेट घेण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तापमान वाढल्यास पुढे काय? या भीतीने बारामतीकर धास्तावले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jalgaon News : जळगावमध्ये उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू
Heat Stroke : लग्नाचा आनंद काळाने घेतला हिरावून ; उष्माघाताने विवाहितेचा मुत्यू ; जळगावातील घटना..
Summer | ‘या’ कारणांमुळे उष्माघाताने होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या उष्माघातावरील उपचारांविषयी माहिती…