Baramati News : बारामती, (पुणे) : लोणी भापकर (ता. बारामती) येथील सर्पमित्राचा १५ ऑगस्टला विषारी नाग चावल्याने दवाखान्यात उपचारादरम्यान शनिवारी (ता. १९) मृत्यू झाला आहे.
विजय छबुराव यादव (रा. लोणी भापकर, ता. हवेली) असे सर्पदंशाने मृत्यु झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे. बारामती तालुका खरेदी विक्री संघात ते कर्मचारी म्हणुन कार्यरत होते.
पकडताना नागाने केला होता दंश
मिळालेल्या माहितीनुसार, विजय यादव हे ३० वर्षापासुन सर्पमित्र म्हणुन विनामोबदला ते समाजात काम करीत होते. खराडवाडी येथील युवराज भापकर यांच्या घरानजीक मंगळवारी (ता. १५ ) विषारी सर्प निघाल्याची माहिती यादव यांना मिळाली. (Baramati News ) त्यास पकडण्यासाठी यादव तेथे आले होते. गोठ्यात असलेल्या जनावरांच्या मुरघासाच्या खड्डया जवळच नाग पकडताना यादव यांना सापाने दंश केला. मात्र त्यातुनही त्यांनी स्वत:स सावरुन नागास पकडले, व निर्जन स्थळी सोडुन दिले.
यावेळी यादव बेशुद्धावस्थेत गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांची प्रकृती खालावलेली होती. (Baramati News ) मात्र दोन दिवसापुर्वी प्रकृती सुधारना होत असताना शनिवारी त्यांचा मृत्यु झाला.
दरम्यान, त्यांच्या निधनाची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : सायकलला १६ आरसे अन् ८ इंडिकेटर; बारामतीतील ७५ वर्षीय अवलियाचे अनोखे सायकलप्रेम!
Baramati News : बारामतीतील व्यावसायिकाला १० लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी