गोरख जाधव
Baramati News : डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी परिसरातील ग्राहकांना मागील चार दिवसांपासून आयडिया कंपनीच्या मोबाईल नेटवर्कमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. फोन अचानकपणे कट होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू न येणे, फोन भलतीकडेच लागणे, क्रॉस कनेक्शन, फोन न लागणे, आवाजात तफावत जाणवणे अशा समस्यांमुळे डोर्लेवाडीसह परिसरातील आयडिया कंपनीचे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
समस्यांमुळे ग्राहक त्रस्त
बारामती परिसरातील नागरिकांनी आयडिया कंपनीचे पोस्टपेड क्रमांक एक हजार रुपयांपासून ते २० हजार रुपये किमतीपर्यंत खरेदी केले आहेत. त्यातच ७० टक्के नागरिकांनी आयडिया या कंपनीच्या नेटवर्कला प्राधान्य दिले आहे. (Baramati News) मात्र, सध्या उद्भवणाऱ्या नेटवर्क समस्यांमुळे बँकिंग सेवेवर परिणाम होत आहे. प्रत्येक अँड्रॉइड मोबाईल फोनवर फोन पे, गूगल पे, अमेझॉन पे, भारत पे, पेटीयम यासारखे डिजिटल व्यवहार करण्यासाठी नेटवर्क नसल्याने ग्राहकांचे व्यवहार खोळंबत आहेत.
सध्या पूर्व हवेलीतील सर्वच भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र, ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता टॉवरची संख्या कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कॉल ड्रॉप आणि रेंज या समस्यांमुळे आयडिया कंपनीचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. (Baramati News) एकीकडे नेट पॅक आणि मोफत व्हॉइस कॉलसाठी आकर्षक सवलती जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करतात. मात्र, नेटवर्क सेवेकडे दुर्लक्ष करतात, असे चित्र दिसत आहे.
या समस्येविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्ते हरिदास आटोळे म्हणाले की, मी मागील काही वर्षांपासून आयडिया या कंपनीचे सिमकार्ड वापरत आहे. (Baramati News) परंतु अत्यंत वाईट सेवा आजपर्यंत कधी अनुभवली नव्हती. वारंवार कंपनीला फोन करुन तक्रार केली तरी व्यवस्थित सेवा मिळत नाही. त्यामुळे घरातील सर्वांची आयडिया या कंपनीची सिमकार्ड बंद करून दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्याचा विचार करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : निरेतील ज्युबिलंट इनग्रेव्हीया कंपनीत अपघात; चार कामगार जखमी; एक गंभीर
Baramati News : बारामती-वालचंदनगर रस्त्यावर झालेल्या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू..