गोरख जाधव
Baramati News : डोर्लेवाडी : जालना येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये ‘भरला आता पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा…’ अशा घोषणा देण्यात आल्या. झेंडा कोणत्याही पक्षाचा असो, मात्र त्यांचा दांडा हा मराठा समाजाचा आहे. जो आरक्षण देईल, त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार बारामतीकरांच्या मोर्चात व्यक्त करण्यात आला. आता बारामतीकरांची मागणी अजित पवार पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीकरांची मागणी अजित पवार पूर्ण करणार का, याकडे सर्वांचे लक्ष
दरम्यान, सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर आगामी सर्व निवडणुकांवर मराठा समाज बहिष्कार घालेल. एकही मराठा मतदार मतदान करणार नाही. वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करु. बारामतीचा हा संदेश राज्यात जाईल, अशी भूमिका मोर्चामध्ये मांडली गेली. बारामती हा पवारांचा बालेकिल्ला आहे. (Baramati News) येथे अजित पवार यांनी दिलेला शब्द काटेकोरपणे पाळला जातो. याच बारामतीकरांनी अजित पवार यांना महाराष्ट्रातील नंबर एकचे मताधिक्य देऊन निवडून दिले होते; मात्र, याच बारामतीकरांनी आता अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी केली आहे.
बारामती शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला बारामतीकरांनी १०० टक्के प्रतिसाद दिला. या वेळी बारामती शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी ‘भरला आता पापाचा घडा, अजितदादा बाहेर पडा’ अशा घोषणा दिल्या. जालना येथे (Baramati News) मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा व त्यानंतर झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी हा निर्धार व्यक्त झाला.
दरम्यान, मराठा समाजाच्या वतीने मागितले जाणारे आरक्षण कोणावरही अन्याय करणारे नसून, त्यांच्या न्याय्य हक्काचे आहे. कोणाचेही आरक्षण डावलून आम्ही आरक्षण मागत नाही तर आम्ही आमच्या हक्काचेच आरक्षण मागत असल्याचे या वेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. (Baramati News) प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार गणेश शिंदे निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : निरेतील ज्युबिलंट इनग्रेव्हीया कंपनीत अपघात; चार कामगार जखमी; एक गंभीर
Baramati News : बारामती-वालचंदनगर रस्त्यावर झालेल्या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू..
Baramati News : बारामतीत उभारणार २०० कैदी क्षमता असणारे नवे कारागृह