Baramati News : बारामती, (पुणे) : आयुष्यात कितीही मोठे व्हा पण आपल्या आयुष्यात असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे आई-वडिलांची मान शरमेने खाली झुकेल असे आवाहन लोणी भापकर (ता. बारामती) येथील लोणी भापकर येथील स्वच्छता अभियान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
लोणी भापकर (ता. बारामती) येथील ग्रामपंचायत हद्दीतील श्री काळभैरवनाथ मंदीरात स्वच्छता अभियान फाउंडेशन लोणी भापकरच्या वतीने पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, बारावी व दहावीच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी गुणवंत विद्यार्थी यांची गावातुन घोड्यावरून मिरवणूक काढुन विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केले. गुणवंत विद्यार्थी यांचे पालक व शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित असेलेल्या ग्रामस्थांचे, सेवानिवृत्त अधिकारी स्वच्छता अभियान ग्रुप यांना मदत करणारे संजय पारडे, चारूदत्त बारवकर, माऊली भापकर, संजय गोलांडे, हर्षल प्रभुणे यांचेही स्वागत करून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये लोणी भापकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर यांनी सोसायटीच्या वतीने तसेच विलास भापकर, सुभेदार माणिक भापकर व लोणी भापकर ग्रामस्थ यांचे वतीनेहि गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार केला. त्यावेळी गुणवंत विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी आपआपली मनोगत व्यक्त केली.
दरम्यान, कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकाश भापकर, सुत्रसंचालन अविनाश गायकवाड, ग्रुपचे कामाचा आढावा अभिजीत भापकर यांनी दिला. स्वच्छता अभियान फाऊंडेशनची पुढील ध्येय व उद्दिष्ट सचिन पवार यांनी सांगितली. तर आभार हरीश्चंद दिक्षित यांनी मानले.