Baramati News : बारामती : बारामती तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शेतकऱ्याने जमिनीच्या वादात प्रशासकीय अधिकाऱ्याकडून न्याय मिळत नसल्याने रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. (Baramati farmer set fire to premises of Tehsil office; Find out why)
रोहिदास माने असे रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी इंदापूर तालुक्यातील रेडणी येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजते. (Baramati News) दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच बारामती शहत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व माने यांना ताब्यात घेत त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत संबंधित शेतकरी बारा टक्के भाजला असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.
जमिनीच्या वादात न्याय मिळत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, दोन कुटुंबात रस्त्यावरुन वाद आहे. या प्रकरणात या पूर्वीही इंदापूरच्या तहसिलदारांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. (Baramati News) या बाबत 4 मे रोजी उपोषणही संबंधितांनी केले होते, ते उपोषण 7 मे रोजी माघारी घेण्यात आले होते. परंतु 11 व 12 मे 2023 रोजी रस्त्यासंदर्भात पोलीस बंदोबस्त देऊन रस्ता करू असे आश्वासन देऊन आपली दिशाभूल केली व उपोषण सोडवले आणि न्याय मात्र मिळालाच नाही. दिलेल्या आदेशानुसार इंदापूर तहसील कार्यालयाकडून पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. त्यामुळे पाच जून रोजी आपण प्रशासकीय भावनासमोर आत्मदहन करणार आहोत असा इशारा या शेतकऱ्याने दिला होता आणि त्याने यासंदर्भात यापूर्वीच कळवले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याने थेट पेटवून घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामतीत कार आणि बाईकच्या अपघातात २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू