Baramati News : बारामती, (पुणे) : स्वत:च्या पदाचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर करून ९ कोटी ६२ लाखांच्या फसवणुकी प्रकरणी सह्याद्री अॅग्रो व डेअरी प्रा. लि. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकावर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हो घटना २०१६ ते २०२१ या कालावधीत ही घटना घडली आहे.
आशिष दुबे (रा. बाणेर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष पोपटराव सावंत (रा. रितू अपार्टमेंट, छत्रपती संभाजीनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री अॅग्रो व डेअरी प्रा. लि. मध्ये सन. २०१६ ते २०२१ या कालावधीत या कंपनीच्या संचालक मंडळाने दुबे यांची मुख्य व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमणूक केली होती. (Baramati News) त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून कंपनी तोट्यामध्ये असल्याचे माहिती असताना देखील लाभांश मिळविण्यासाठी ती नफ्यामध्ये दाखवून कंपनीचे कर स्वरुपात १ कोटी ४० लाख २० हजार रुपयांचे नुकसान केले.
स्वत:ला ५२ लाख ५४ हजार रुपयांचा लाभांश प्राप्त करून देय नसलेला ३७ लाख ४९ हजार रुपयांचा बोनस प्राप्त केला. रजेच्या दिवशी कर्तव्यावर न येता कर्तव्य प्राप्त केल्याचे दाखवून २२ लाख ५४ हजार रुपये प्राप्त केले. (Baramati News) इतर वाहनांपेक्षा चढ्या दराने नातेवाइकांची वाहने कंपनीमध्ये लावून ४ लाख ६८ हजार रुपयांचे नुकसान केले.
दरम्यान, याशिवाय नोकरीवर काढले असताना देखील कंपनीची भाडे तत्त्वावरील वाहने जमा न करता २ लाख ७१ हजार रुपयांच्या नुकसानीस (Baramati News) कारणीभूत ठरल्याने बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.