Baramati News : बारामती, (पुणे) : मुढाळे ते कोऱ्हाळे बुद्रुक रस्त्यावर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. ३१) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
मयुर जालिंदर जगताप (वय २६, रा. माऊडी क. प, ता. पुरंदर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
मुढाळे ते कोऱ्हाळे बुद्रुक रस्त्यावर घटना
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील मुढाळे खिंड येथे मुढाळेकडून कोऱ्हाळे बुद्रुकच्या दिशेने निघालेली स्विफ्ट डिझायर गाडी व विरुद्ध बाजूने आलेली दुचाकी यांच्यात समोरासमोर जोरदार अपघात झाला. (Baramati News) या अपघातामध्ये दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी कार खिंडीतील भराव्यावरून खाली कोसळली.
दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळतात वडगाव निंबाळकर पोलीस अपघात स्थळी दाखल झाले. (Baramati News) पोलिसांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी बारामती येथील सिल्वर जुबली शासकीय रुग्णालयात दाखल केला. तपास पोलीस करीत आहेत.
विवाहाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच नियतीचा घाला
अपघातात मृत्युमुखी पडलेला मयुर हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो घरातील एकमेव कर्ता मुलगा होता. (Baramati News) त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच नियतीने त्याच्यावर घाला घातला आहे. मयुरच्या अशा अकाली जाण्याने माऊडी क. प. गावावर दुःखाचा डोंगर कोसळला
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : अतिउष्णतेने बारामती शहरात घेतला दुचाकीने पेट ; बारामतीत सूर्य आग ओकतोय…