Baramati News : बारामती, (पुणे) : मैदानात क्रिकेट खेळत असताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांनी एकाला लोखंडी गज, कोयत्याने जबर मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुणवडी (ता. बारामती) येथे रविवारी (ता. ०४) हि घटना घडली आहे. याप्रकरणी ५ जणांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (5 people beat one with an iron yard and a crowbar in a dispute over throwing the ball while playing cricket; Incidents in Baramati Taluka..)
बारामती तालुक्यातील गुणवडी येथील घटना..
हर्षवर्धन नवनाथ गावडे (वय-१९) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Baramati News) गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बारामती पोलिसांनी भूषण संजय गावडे, निखिल संजय गावडे, दीपक ऊर्फ भैय्या अनिल वायसे, अण्णा गोरख हारे आणि विनोद पोपटराव गावडे (सर्वजण रा. गुणवडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन गावडे आणि मारहाण करणारे आरोपी हे एकाच गावातील आहेत. सर्वजण जिल्हा परिषद शाळेजवळ क्रिकेट खेळत होते. या वेळी हर्षवर्धनचा इतर पाच जणांशी बॉल टाकण्यावरून शाब्दिक वाद झाला. (Baramati News) या वादात भूषणने त्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको, असे हर्षवर्धन म्हणाला आणि त्याला मारहाण केली.
‘तुझे बऱ्याचदा झाले आहे. तुला चांगलाच हिसका दाखवतो, ‘असे म्हणत भूषणने घरी जात कोयता आणला. (Baramati News) निखिल लोखंडी गज घेऊन आला. भूषणने कोयत्याने डाव्या बाजूस कपाळावर मारले, तर निखिलने डोक्यात गज मारला. अन्य तिघांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, ‘तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी हर्षवर्धनला रात्री बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. (Baramati News) प्राथमिक उपचारांनंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती पोलिस पुढील तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामतीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या आवारात घेतले पेटवून; जाणून घ्या कारण