Baramati Health Center | डोर्लेवाडी, (बारामती) : येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढ्या मोठ्या रुग्णालयात स्वछतेचा आभाव भासत आहे त्याची कोणत्याही प्रकारे स्वच्छता ठेवली जात नाही. त्यामुळे रुग्णांसोबत येणाऱ्या नातलगांसाठी सध्या घाणीने माखलेल्या स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे गावाला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या रुग्णालयाची ही अवस्था असेल तर गावाच्या आरोग्याचा सर्व्हे करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या आरोग्याचा सर्व्हे कुणी करावा ? असा सर्वसामान्यांचा प्रश्न पडला आहे.
आरोग्य केंद्रात ठिकठीकाणी घाणीचे साम्राज्य…
डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील ७ ते ८ गावांतील रुग्ण उपचार व औषध गोळ्यांसाठी येत असतात. तसेच आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असून आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखालील गावात गरोदर मातांना ने – आण करणे, अपघाता दरम्यान रुग्णवाहिका देखील तात्काळ उपलब्ध होत असते. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिकठीकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.
स्वच्छतागृहाची स्वच्छता नसणे, ठीकठिकाणी रक्ताने माखलेले छोटे छोटे कापूस पडलेले, बेसिनची दुरावस्था, काही भाग धुळीने माखला आहे. काही ठिकाणी इंजेक्शन सिरींज, गंजलेले साहित्य, बाथरूमची दुरवस्था आहे. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध असून आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखालील गावात गरोदर मातांना ने -आण करणे, अपघाता दरम्यान रुग्णवाहिका देखील तात्काळ उपलब्ध होत असते. आरोग्य केंद्रात रात्री निवासी वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित असतात. आरोग्य केंद्र वेळेवर उघडून कर्मचारी देखील उपस्थीत असतात. मात्र, आरोग्य केंद्राला घाणीच्या साम्राज्याने वेढले आहे त्याची स्वच्छता ठेवावी अशी मागणी जोर धरू लागली.
सर्वसोयीसुविधा व रुग्णांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरु…
डोर्लेवाडी आरोग्य केंद्रात परिसरातील ७ ते ८ गावांतील रुग्ण उपचार व औषध गोळ्यांसाठी येत असतात. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी देखील वेळेवर उपस्थित राहून रुग्णांना सेवा देण्याचे काम अविरतपणे करत आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, फार्मासिस्ट, लॅबटेक्निशन, क्लार्क, शिपाई, रुग्णवाहिका चालक, असे २४ ते २५ कर्मचारी कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा साठा पुरेसा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!