बारामती, (पुणे) : बारामती नगरपरिषद समोरुन वॉकिंग करताना पाठीमागून जोरदार येणाऱ्या बसने दिलेल्या धडकेत एका 82 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. 19) सकाळी सव्वा सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोतीलाल उत्तमचंद दोशी (वय – 82, रा. सुभाष चौक, बाटा शोरूम शेजारी बारामती ता बारामती) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर सुनिल पांडुरंग शेंडगे (वय 39, रा. सध्या खंडोबानगर बारामती, ता बारामती, मुळ रा. भिगवण ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सतिष कांतीलाल दोशी (वय 71, रा- मातृपित्रु छाया बिल्डीग पहिला मजला कचेरी रोड ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मोतीलाल दोशी घरातून पायी चालत वॉकिंग करता गेले होते. वॉकिंग करता गेले असता पाठीमागुन येणाऱ्या टाटा कंपनीच्या बसने जोरात धडक दिली. या अपघातात बसचे चाक मोतीलाल दोशी यांच्या डोक्यावरुन गेली. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर चालक आरोपी सुनिल शेंडगे हा त्या ठिकाणी न थांबता बससह भिगवण बाजूकडे पळून गेला. याप्रकरणी सुनिल शेंडगे याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात BNS 281,106(1) मो. वा. का. क 184,134,177,112/183(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार टापरे करीत आहे.