उरुळी कांचन, (पुणे) : विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या वेळी मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही किंवा मोबाईल नेलाच तर बाहेर ठेवावा लागणार आहे.
मोबाईल जवळ ठेवून मतदान केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.
मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून, मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या अंतरावर ठेवावा लागणार आहे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून.)
उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने कोणत्याही प्रकारची शस्त्रे (शस्त्र अधिनियम 1959 मध्ये नमुद केले प्रमाणे) बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी / कर्मचारी वगळून),
बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे. पाच किंचा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून)
दरम्यान, उरुळी कांचन गावात मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांनी आपली वाहनेबाजारतळ पटांगण व पद्मश्री मणीभाई देसाई महाविद्यालया समोर मोकळे मैदानावर पार्किंग करावीत, असेही आदेशात म्हटले आहे.