उरुळी कांचन : हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भाडळे तर सचिव पदी शिंदवणे (ता. हवेली) येथील भाऊसाहेब महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हवेली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन बैठकीचे आयोजन वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक, विद्यालयात करण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली आहे.
या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, सहाय्यक क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, तालुका खेड अधिकारी प्रकाश मोहरे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघाचे राज्याचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, पुणे जिल्हा क्रीडा शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढमाले, जोगेश्वरी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. एन. धुमाळ, हवेली तालुक्यातील क्रीडा शिक्षक व शिक्षिका, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी क्रीडा शिक्षकांना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे व सहाय्यक क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिक्षक पांडूरंग लांडे यांनी मानले.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे :
हवेली तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भाडळे, उपाध्यक्षपदी सूर्यकांत क्षीरसागर, सचिवपदी भाऊसाहेब महाडिक, कार्यकारणी सदस्य अनिल चंद, तानाजी पाटील, रमेश विचारे, तात्यासाहेब सणस, प्रकाश इंगवले, प्रताप फडतरे, मोहन लोखंडे, संगिता शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.