पुणे : खुनाचा प्रयत्न करून १० वर्ष फरार झालेल्या आरोपीला पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायधीश ए. एन. मरे यांच्या कोर्टाने आरोपीला अटी व शर्थींवर जामीन देण्याचे आदेश पारित केले आहेत, अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली.
राजन सहानी असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोंबर २०१४ ला आरोपीने फिर्यादी याचे मालकाचे भावास शिवीगाळ केली होती. फिर्यादी व त्याचे मालक त्यांचा भाऊ असे आरोपीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते. आरोपी राजन व इतर ४ लोकांनी काठी, दांडक्याच्या साह्याने फिर्यादी त्याचे मालक व मालकाचा भाऊ यांना जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण केली होती. तेव्हा एकाच्या डोक्यात काठी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
फिर्यादीच्या तक्रारीवरून वाकड पोलिसात खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून १० वर्ष आरोपी फरार झाला होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये वाकड पोलिसांनी राजन यास अटक केली. यावेळी आरोपी राजनची रवानगी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
दरम्यान, येरवडा कारागृहात असताना आरोपी राजन याने अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीने कुठलाही गुन्हा केला नसून या उलट फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी आरोपीस त्याचे घरी जाऊन मारहाण केलेली आहे, असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला. याकामी वकील अॅड. नितीन भालेराव यांना अॅड. मयूर चौधरी, अॅड. स्वप्नील दाभाडे यांनी मदत केली.