Bacchu Kadu News : पुणे – राज्याचे माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून प्रहार संघटनेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बच्चू भाऊ अंगार बाकी सब भंगार हैं, आपना भिडू बच्चू कडू, बच्चू भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ हैं, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या (२०१९) प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. “सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं? असे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यावरून राहुल गांधींविरोधात भाजपाने खटला दाखल केला. त्यावर सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवले असून त्यांना २ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी (लोकसभा सदस्यत्व) रद्द करण्यात आली आहे.
तोच मुद्दा उपस्थित करत सर्वांना समान न्याय मिळायला हवा असे म्हणत आमदार बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करणारे बॅनर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पुण्यातील पाषाण रोड परिसरात लावले होते.
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात केली घोषणाबाजी ….
‘आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात.” असे बॅनवर लिहिले असून काही पुणेरी टोले देखील देण्यात आले होते.
त्याचा निषेध करत आज (ऱविवारी) प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
युवक राष्ट्रवादीने केलेल्या बॅनरबाजी केल्याने त्याचा निषेध करत बच्चू कडू यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला आहे. 2017 नाशिक पालिकेत येथे कडू यांनी अपंगांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी गुन्हे दाखल केले होते. त्याचेच ते प्रकरण होते. काम करणाऱ्या नेत्यावर कोणा आरोप करणार असेल तर ते सहन केले जाणार नाहीत. अशी प्रतिक्रिया प्रहारचे संतोष साठे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
दरम्यान, ही सगळी मुर्खता आहे. हे अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स आहेत. मला दोन कलमांमध्ये शिक्षा झाली आहे. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते मला लागू होत नाही. त्यांना काही कामं नाही. तही सगळी अज्ञानपणाची लक्षणं आहेत. अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Politics : राजकारणातील योगायोग!… खासदारकी गेली राहुल गांधीची ; चर्चा मात्र मनमोहन सिंगाची
Politics News : ;..म्हणून शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घेतला ; आमदार रविंद्र धंगेकर