लोणी काळभोर, (पुणे) : शाळेतून घरी निघालेल्या मुलीला एका बुरखा घातलेल्या महिलेने जबरदस्ती ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मुलीने बुरखा घातलेल्या महिलेच्या हाताला हिसका दिल्याने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न असफल झाला.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परीसरात मंगळवारी (ता. ०७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक महिला बुरखा घालून कवडीपाट परिसरात असलेल्या हनुमान मंदिराकडे निघाली होती. यावेळी शाळा सुटल्याने अनेक विद्यार्थी हे रस्त्यावरून घरी निघाले होते. यावेळी बुरखा घातलेल्या महिलेने मुलीला अडवले.
सदर मुलीला महिलेने अडवले व काहीतरी विचारपूस केली. यावेळी मुलीने माहिती दिल्याचे व्हिडीओत दिसून आले. यावेळी बुरखा घातलेल्या महिलेने या मुलीचा हात पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान दाखवत त्या मुलीने त्या ठिकाणावरून पळ काढला.
View this post on Instagram
दरम्यान, मुलीने केलेल्या या प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक केले जात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात