ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : एल अँड टी फाटा येथील एक्सेस बँकेच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना 26 मे रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएमची पाहणी केली. त्यावेळी एटीएमचा सेप्टी दरवाजा आणि कनेक्टर तोडलेले आढळून आले.
या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चोरट्यांना अटक केली आहे. नानासाहेब आरुण पाटील (वय-34, रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर, जि. पुणे) गोपाळ गोकूळ जोहारे (वय-31, रा. सनवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) आणि सिद्धार्थ मिलिंद कांबळे (वय-34, रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नवे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एल अँड टी फाटा येथे एक्सेस बँकेच्या एटीएम मशीन ठेवण्यात आली आहे. 26 मे रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास हे एटीएम मशीन चोरट्यांकडून फोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना एटीएम मशीनचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी एस. एस. कंपणीला व्हिडीओ कॉल करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून दिले. कंपनीने तिन आरोपींचे फोटो पोलिसांना पाठवले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला.
दरम्यान, पोलिसांनी शोध सुरु केला असता तळेगावच्या दिशेने जात असताना जवळच दुसरे हिताची कंपणीचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आले. या चोरट्यांचा कारनामा सिसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. शिक्रापूर पोलीसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत काळे करत आहेत.