Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जीर्ण खांब, तारा, झाडाच्या फांद्या ठरत आहेत महावितरणाची डोकेदुखी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 27 May 2024, 15:35
Mahavitran adds 122 cases in lokadalat Pune

महेश सूर्यवंशी

देऊळगाव राजे (दौंड): पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच अवकाळी पावसाने आपले उग्र रूप धारण केले आहे. या काळात दौंड तालुक्यातील विविध गावात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. आधीच उष्णतेने व्याकुळ झालेल्या नागरिकांना विजेच्या या लपंडावाचा मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसाने अचानक थैमान घातल्यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच झोप उडाली आहे. अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे जीर्ण झालेले खांब तसेच विद्युत वाहिनीवर येणार्‍या झाडांच्या फांद्या ही सर्वांची डोकेदुखी बनली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून देऊळगाव राजे व परिसरात अवकाळी वादळी वारे व पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत खांब कोसळत आहेत. तर ठीक ठिकाणी विद्युत वाहिनीवर येणार्‍या झाडांच्या फांद्या पडतात. त्यामुळे वीज वाहिनी तुटते. त्याचबरोबर इतर अनेक समस्यांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. या वीज वाहिनीवर असणारी झाडे तोडण्यास परवानगी नसल्यामुळे वीज वाहिनीवर येणार्‍या झाडांच्या फांद्या तोडून वीज पुरवठा सुरु करण्यासाठी कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 

पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनी झाडांच्या फांद्या तोडून वीज पुरवठा सुरळीत कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करते. एका बाजूला विजेचे वाजवी दर लावले आहेत. वीज वापर, वीज कर, वीज भाडे, मीटर भाडे असे विविध कर लावून ग्राहकावर लाईट बिल आकारण्यात येते. ग्राहक ते वेळोवेळी भरतात. मात्र, ग्राहकांना चांगली सेवा देणे हे शासनाचेही कर्तव्य आहे. सध्या देऊळगाव राजे तसेच परिसरातील विविध गावात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकरी वर्ग तसेच विजेवर चालणारे झेरॉक्स, पिठ चिक्की, हॉटेल व्यवसायिक, दूध संकलन केंद्र यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

दौंड ते देऊळगाव राजे उपकेंद्राच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीची देखभाल व दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. जेणेकरून उच्चदाब वाहिनी बंद पडणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरू राहील, यांची काळजी महावितरणने घेणे गरजेचे आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

तळेगाव ढमढेरे येथे एकाच दिवशी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न; तिघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.