पुणे : पुण्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात पुन्हा एकदा एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. संबधीत तरुणीने आरडाओरडा केल्याने हल्ला करण्यासाठी आलेले तरुण पळून गेले. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हा प्रकार खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
दरम्यान, यापूर्वी पेरूगेट पोलीस चौकीजवळील मुलीवर झालेल्या हल्याची पुनारवृत्ती टळली असून थोडक्यात तरुणी बचावली आहे. एकतर्फी प्रेमातुन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
पुण्यात मुलींवर हल्ल्याच्या घटनांत वाढ
पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ल्याच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी सदाशिव पेठेत एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्या मित्रानेच भर रस्त्यात कोयत्यानं हल्ला केला होता. आता आज पुन्हा एकदा मुलीवर हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न उपस्थित होत आहे.