केडगाव (दौंड) : शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यावर म्हणजेच 100 मीलिमिटरच्या पुढे पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. तसेच शेतकऱ्याची बी, बियाणे, खते खरेदीसाठी फसवणूक होऊ नये, यासाठी तालुका कृषी अधिकारी राहुल माने व मंडल कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये दुकानाची तपासणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केलेली आहे. त्यांना दर्जेदार खते, बी बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने कृषी दुकानदारांसह गोडाऊनची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी खते तसेच बी – बियाणे आपल्या भागातील अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्र विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. व त्या संदर्भातील पावती बिल, टॅग जपून ठेवावा. बियानाची उगवण क्षमता न झाल्यास ते टॅग व पावती महत्त्वपूर्ण असते.
– राहुल माने, तालुका कृषी अधिकारी (दौंड)