उरुळी कांचन, (पुणे) : आगामी शिरूर – हवेली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता. 28) रूट मार्च काढण्यात आला.
आचार संहिता कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या करीता सोमवारी सकाळी उरूळी कांचन गावात आश्रम रोड, दतवाडी, रेल्वे स्टेशन, तुपे वस्ती, महात्मा गांधी विद्यालय, एम जी रोड, पांढरस्थळ एलाईट चौक रस्ता या मुख्य मार्गावर तसेच सोरतापवाडी, कोरेगाव मूळ गावात रूट मार्च काढण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला. रूट मार्चमध्ये उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील 02 अधिकारी, 12 अंमलदार, सशस्त्र सीमा बलचे 03 अधिकारी आणि 41 जवान सहभागी झाले होते. आगामी विधानसभा निवडणूक 2024 साठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे.
दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, असिस्टंट कमांडड विकास राजगुरु, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश भोसले, खोमणे, पोलीस हवालदार उमेश जगताप, महिला पोलीस हवालदार मनीषा कुतवळ, गायकवाड, सांगडे, भुजबळ, काळे, कामठे, खांडेकर, गायकवाड, देवकाते यांच्यासह सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांच्यासह एकूण 58 जण उपस्थित होते.