मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदर चर्चा रंगल्या होत्या. याबाबत दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं.
अशातच आता अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच स्पष्ट झालं आहे. भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु असून आज दुपारी साडेबारा वाजता भाजप कार्यालयात अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून ४८ तासांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असं अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मात्र, आज अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार आहेत. दरम्यान, अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.