गणेश सूळ
Ashadhi Wari 2023 केडगाव : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुमारे दोन दिवस यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या अर्थाताच दौंड तालुक्यात असणार आहे. या भव्य दिव्य अशा सुख सोहळ्याच्या या दोन दिवसाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा, सुव्यवस्था राखली जावी, वारकरी व भाविक यांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी यवत पोलीसांनी कडेकोट बंदोबस्तचे नियोजन केले आहे.
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी यवत परिसरातील प्रमुख पदाधिकारी , धार्मिक आध्यात्मिक शेत्रातील कार्यकर्ते यांच्या सोबत चर्चा करून बंदोबसतासाठी नियोजन केले.या बंदोबस्तमध्ये एक सहाय्यक पोलीस अधीक्षक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, बारा पोलीस निरीक्षक,69 सहाय्यक पोलिस निरीक्षक,600 अंमलदार,100 महिला सह सहाशे होमगार्ड, राखीव पोलीस दल दोन तुकड्या,दोन दंगल नियंत्रण पधके नेमण्यात आली आहेत.
दरम्यान, वरवड येथील एकनाथ सीताराम दिवेकर कॉलेजचे एनसीसी चे 100 जवान अशा दीड हजार हून अधिक पोलीस व त्यांना सहकार्य करणारी पथके बंदोबस्तात सामील होणार असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.